शाळांसाठी आता ‘ॲक्ट फॉर एज्युकेशन ’!

सकाळ सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
sakal social foundation
sakal social foundationsakal
Summary

सकाळ सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

सकाळ सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. ‘सोशल फॉर ॲक्शन’ या अभियानांतर्गत आतापर्यंत माहेर (पुणे), माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान (धुळे), एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास, भारत जोडो युवा अकादमी (नांदेड), प्रार्थना फाउंडेशन (सोलापूर) व यशोधन ट्रस्ट (सातारा) या सहा स्वयंसेवी संस्थांना मिळालेली मदत त्या-त्या संस्थांना वर्ग केली आहे. अन्य दोन संस्थांचे अभियान लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांबरोबरच ‘सोशल फॉर ॲक्शन’ या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारणी, डिजिटल ई-लर्निंग सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा व STEAM लॅब उभारणी अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागाच्या व सामूहिक मदतीच्या (क्राउड फंडिंगच्या) माध्यमातून ‘ॲक्ट फॉर एज्युकेशन’ उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या उपक्रमासाठी प्राथमिक टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पंधरा शाळांमध्ये उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये मावळ, वेल्हे, दौंड, भोर, आंबेगाव, पुरंदर, इंदापूर, खेड व मुळशी तालुक्यांतील शाळांची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या शाळांमध्ये स्वच्छातागृहं, ई-लर्निंग सेट-अप अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एकविसाव्या शतकात मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर तंत्रविज्ञानाचा प्रभाव दिसून येतो, त्यामुळेच एकविसाव्या शतकास इन्फॉर्मेशन एज म्हटलं जातं. बदलत्या काळानुसार शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना डिजिटल ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण, तसंच कौशल्यविकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, आर्ट व गणित विषयांचं एकत्रीकरण करून विकसित केलेल्या STEAM लॅबचं प्रशिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणं आवश्यक आहे. याशिवाय शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते. शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहं असणं गरजेचं आहे, हे ओळखून विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहं, डिजिटल ई-लर्निंग सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा व STEAM लॅब अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून, शालेय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे या मुख्य उद्देशाने ‘सोशल फॉर ॲक्शन’अंतर्गत ‘ॲक्ट फॉर एज्युकेशन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उपक्रमासाठी लोकसहभाग व सामूहिक मदतीची गरज - या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील जास्तीत जास्त शाळांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करून, हजारो विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी व या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून लोकसहभाग व सामूहिक मदतीची गरज आहे. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक कंपन्या, सीएसआर कंपन्या आदींना या अभियानात सहभागी होऊन, सामूहिक आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

कशी कराल मदत...

https://socialforaction.com/ ही लिंक ओपन करून, ‘सोशल फॉर ॲक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक ‘ॲक्ट फॉर एज्युकेशन’ या अभियानाची माहिती घेऊ शकतात. तसंच, ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट ‘सोशल फॉर ॲक्शन’ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८०-जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

हात देणगीदारांचा...

‘सोशल फॉर ॲक्शन’ या अभियानाच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांना पाच हजार व त्यापेक्षा अधिक रक्कम देणगी दिलेले देणगीदार विनायक मणेरीकर, अजित पाटील, ऊर्मिला दीक्षित, विजया पाटील, संदेश कदम, सुजाता माने, अमोल थोरात, चंद्रशेखर पाटील, धनंजय दंडवते, एन. पी. शिवतारे, चिन्मय साखलकर, रमेश पुरोहित, रवींद्र बांदीवडेकर, अमोल वैद्य, सावन परदेशी, अनिता भोंडे, मिलिंद वैद्य, श्रीराम पुराणिक, रोहित दिवाण, प्रियांका धनपावडे, शिल्पा वाळवेकर, वसंत पंदरकर, सुभाष झुंजारराव, सोनल बनोरे, प्रिया जोशी, चारुलता प्रभुदेसाई, दिवाकर राणे, मयूरेश दाते, मोहन कुलकर्णी, रसिका वाकळक, परुल गुप्ता, तन्मयी धामणकर, हेमंत कुलकर्णी, अनुराधा फडके, अपूर्व वाघमारे, अनिल अलवाणी, शशी सांखला, अनिल चौधरी, सुखदा दातार, मधुसूदन सतावलेकर, भाऊसाहेब जाधव, सुधा खराटे, बळवंत जोगळेकर, राहुल ओटारी, उल्का श्रोत्री, मधुसूदन अधिकारीदेसाई, प्रकाश फडतरे, स्वानंद ऋषी, एस. एस. चारणकर, महादेव मगर, हितेश शहा, तुषार देशमुख, प्रमिला व्यास, गोकुळदास बाहेती, उषा हनुमंते, हेमंत नेलवडकर, नंदकुमार कल्याणकर, भूपाल चव्हाण ‘सोशल फॉर ॲक्शन’ या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना पाच हजार व त्यापेक्षा अधिक रक्कम देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावे वेळोवेळी प्रसिद्ध केली जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com