- शाहीन इंदूलकर, shahin.indulkar@gmail.com
प्रत्येकाच्याच आयुष्यात चित्रं रंगवण्याचा काळ कधी ना कधी येऊन गेलेला असतोच. एखाद्याच्या घरातल्या भिंती क्रेयॉनच्या खडूंनी गिरबटलेल्या दिसल्या म्हणजे लहान मुलांचा खुला वावर इथे आहे, असं साधारण लक्षात येतं. तसंच लहानपणी आमच्या घरातही होतं. एका बैठ्या चाळीत दोन खोल्यांचं पत्र्याच्या छपराचं आमचं घर होतं. भाड्याचं असल्याने “घरमालकीण काकी ओरडतील, नको भिंती रंगवू!” असा धाकवजा सूर घरात असायचा. पण आम्ही पोरंच शेवटी! कोण किती रोखणार?