New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

New Marathi Books Review : भगवद्‍गीतेचे सोपे निरूपण करणारे 'गीता पारिजात' ते जगण्याचे वास्तव मांडणारा 'मी फक्त ठेवली गाथा' काव्यसंग्रह; मराठी साहित्यातील नवनवीन पुस्तकांचा आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचा वेध घेणारा हा विशेष लेख.
New Marathi Books Review

New Marathi Books Review

esakal

Updated on

गीता पारिजात

भगवद्‍गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णांनी विविध विषयांवर केलेलं विवेचन कालातीत आहे. आजच्या काळात जीवन जगत असातानाही आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उकल करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. त्यासाठी भगवद्‍गीतेचे थोडे बारकाईने वाचन करून ती सोप्या पद्धतीने समजून घेणे आवश्‍यक ठरते. त्यासाठी ‘गीता पारिजात’ हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकात श्रुती श्रीकांत आपटे यांनी भगवद्‍गीतेतील श्‍लोकांचे सोप्या भाषेत निरूपण केले आहे. गीतेच्या १८ अध्यायांतील श्‍लोकांचे छोटे छोटे संच करून (उदा. पहिला अध्याय श्‍लोक एक ते सहा) आपटे यांनी निरूपण केले आहे. गीतेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही सोपी मांडणी उपयुक्त ठरेल.

  • वैशिष्ट्य : निरूपणाची साधी-सोपी भाषा व दैनंदिन जीवनातील दाखले.

  • प्रकाशक : सुश्री फाउंडेशन

  • पृष्ठे : १२०, मूल्य : २२५ रु.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com