Homi Bhabha Documentary Films Division : डॉ. होमी भाभा; विज्ञानाचा द्रष्टा शिल्पकार!

Father of Indian Nuclear Program History : विज्ञानाच्या पाऊलखुणा शोधणारा एक विलक्षण अनुभव! डॉ. होमी भाभा यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या लघुपटात इंदिरा गांधी, जे.आर.डी. टाटा आणि अनेक दिग्गज शास्त्रज्ञांच्या उपस्थितीतील ऐतिहासिक क्षणांचे संकलन करण्यात आले आहे.
Father of Indian Nuclear Program History

Father of Indian Nuclear Program History

sakal

Updated on

प्रभा जोशी - saptrang@esakal.com

होमी भाभा अ सायंटिस्ट इन ॲक्शन हा लघुपट फक्त पारंपरिक पद्धतीने भाभांचा जीवनपट सांगत नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचं देशाच्या प्रगतीसाठी उपयोजन, कला आणि विज्ञान याचं अतूट नातं, असे अनेक पैलू उलगडून दाखवतो. वेधक उत्कंठापूर्ण मांडणी, मान्यवरांची मनोगत, कॅमेर्‍याने टिपलेल्या सौंदर्यपूर्ण क्षणांचं दर्शन हा सगळाच विलक्षण अनुभव.

कुठल्याही महत्त्वाच्या क्षेत्रात एखादी असामान्य व्यक्ती पूर्ण क्षमता नेतृत्व दाखवत पायाभूत काम करत असते आणि काम अर्ध असतानाच अचानक जग सोडून जाते तेव्हा एक मोठी पोकळी निर्माण होते. दिवंगत व्यक्तीची दृष्टी आणि स्वप्न अशा मार्गावर पुढे नव्याने प्रवास सुरू होतो. हा प्रवास आपलं उद्दिष्ट गाठतो; परंतु त्या व्यक्तीची उणीव भासते. कदाचित काही वेगळं भविष्य घडलं असतं, अशी खंत मागे राहते. थोर भौतिकशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा ६० वर्षांपूर्वी विमान अपघातात जग सोडून गेले तेव्हा आणि आजतागायत भारतीय विज्ञान शाखेला डॉ. होमी भाभांची उणीव जाणवत राहिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com