

Sant Muktabai biography book
esakal
गणाधीश प्रभुदेसाई - ganadhish.prabhudesai@esakal.com
महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभली आहे. प्रत्येक संत, त्यांची शिकवण व कार्य अजूनही समाजाला दीपस्तंभाप्रमाणे ज्ञानप्रकाश देण्याचे कार्य करत आहे. आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ही चार भावंडे म्हणजे मराठी अस्मितेचा मानबिंदू होय. त्यापैकी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘योगिनी’ हे पुस्तक मराठी वाचकांपुढे आले आहे.
लहानपणीची अल्लड-खेळकर मुक्ता ते संतपदापर्यंत पोहचलेली ‘योगिनी’ असा मुक्ताबाईचा संपूर्ण जीवनप्रवास या पुस्तकातून उलगडण्यात आला आहे. मुक्ताईची लहान वयातील समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याची क्षमता असे सर्व पैलू वाचकांपुढे मांडण्यात आले आहेत. मुक्ताईचा भावंडाशी असलेला अनुबंधही दाखवणारे अनेक प्रसंग पुस्तकात आहेत. एकूण २१ प्रकरणांतून मुक्ताई जाणून घेण्याची संधी वाचकांनी मिळाली आहे. लेखिकेची संतसाहित्याच्या मालिकेतील ही पंधरावी आणि एकूण पुस्तकांपैकी ५४ वी कादंबरी आहे.