
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडहून खेडकडे जायला लागलो, की खास कोकणी फील जाणवायला सुरुवात होते. तसा तो घाटमाथ्यावरून उतरल्यावर सुरूच झालेला असतो; पण हे ठिकाण सोडले की जास्त हिरवाई जाणवायला लागते. निसर्गाचे कवच आणखीन घट्ट होते. रस्ता आणखीनच नागमोडी होतो. जसे जसे आपण पुढे जातो तसे ते आणखी जाणवायला लागते. साधारण २०-२२ किलोमीटर अंतर पार केले की आपण दापोली तालुक्याच्या हद्दीत येतो आणि मग ऐन रस्त्यालाच आपल्याला पालगड नावाचे चिमुकले गाव समोर ठाकलेले दिसते. हेच आजच्या भटकंतीचे गाव.