दिनांक ७ सप्टेंबर १९४०, जर्मनीच्या साडेतीनशे लढाऊ विमानांनी इंग्लंडवर हवाई हल्ले सुरू केले. पुढच्या नऊ महिन्यांत अंदाजे ८० हजार बॉम्ब टाकले गेले. दहा लाख इमारतीचं नुकसान झालं आणि प्राणहानी झाली ४० हजारच्या आतबाहेर. मात्र ब्रिटिश समाजानं स्वतःची इच्छाशक्ती एकवटून ठरवलं, की ह्या परिस्थितीसमोर आपण भावनिक शरणागती नाही पत्करणार.