

Marathi Literature and Poetry Collections
sakal
मराठी नियतकालिकांना वैभवशाली परंपरा आहे. दुर्दैवाने ती ऐशींच्या दशकानंतर ओसरत गेली. ‘अंतर्नाद’ मासिकाचा पहिला अंक ऑगस्ट १९९५ मध्ये आला. त्यानंतर पुढे २६ वर्षे साहित्याविश्वात मोलाची भर घालणाऱ्या या मासिकाची वाटचाल मांडणारे हे पुस्तक आहे. ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी हा प्रवास पुस्तकाच्या माध्यमातून उलगडला आहे. एखादे नियतकालिक प्रत्यक्षात कसे सुरू होते व नंतर कसे बंद होते याचा आढावा या पुस्तकात सविस्तरपणे घेण्यात आला आहे. मासिक सुरू करण्यामागचा विचार, वैचारिक भूमिका, संपादकीय कामकाज, व्यावहारिक बाजू, अर्थकारण, शासनाची भूमिका या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकताना उद्याची साहित्यसृष्टी कशी असेल? याचाही आढावा पुस्तकात घेण्यात आला आहे.
वैशिष्ट्य : एक मोठा कालखंड उलगडून सांगणारे लेखन. अनेक संदर्भांसह ओघवते लेखन. प्रकाशक : मौज प्रकाशन, पुणे
पृष्ठे : २६८ मूल्य : ५०० रु.