

New Marathi Books and Literature
esakal
शंभरहून अधिक पेटंट्स नावावर असणाऱ्या एका शास्त्रज्ञ-उद्योजकाचा म्हणजेच डॉ. अशोक वेणीमाधवशास्त्री जोशी यांचा प्रेरक प्रवास ‘ध्यास आणि प्रयास’ या पुस्तकाच्या रूपाने मांडण्यात आला आहे. डॉ. पंडित टापरे, डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद या पुस्तकात देण्यात आला आहे. डॉ. जोशी यांनी भारत-अमेरिका येथील वास्तव्यात शास्त्रज्ञ व परोपकारी लघुउद्योजक म्हणून लौकिक मिळवला. ‘आपल्या आत्म्याला जे स्पर्श करते ते यश’ अशी त्यांची यशाची व्याख्या आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, जडण-घडण, जीवनप्रवास, यश-अपयश... याचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
वैशिष्ट्य : छायाचित्रांसह विविध संदर्भ.
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२८, n मूल्य : २०० रु.