Cervical Cancer Vaccine

Cervical Cancer Vaccine

esakal

Premium|Cervical Cancer Vaccine : गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणाची गरज:; दक्षतेसह संरक्षणाची आवश्यकता

Women's Health Awareness : गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी 'एचपीव्ही' लसीकरण आणि नियमित तपासणी का महत्त्वाची आहे? लसीकरणातील पारदर्शकता, सरकारी धोरणे आणि जागतिक अनुभवांचा सखोल आढावा घेणारा डॉ. अनंत फडके यांचा विशेष लेख; महिलांच्या आरोग्यासाठी जनमताचा दबाव हवा.
Published on

डॉ. अनंत फडके - anant.phadke@gmail.com  

गर्भाशयमुखाचा वयाच्या तिशी-चाळिशीनंतर होऊ शकणारा कर्करोग गर्भाशय कर्करोगविरोधी लसीने टळतो. स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर हा कर्करोग आहे. भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख स्त्रियांना, म्हणजे दहा हजार स्त्रियांमागे दोघींना हा कर्करोग होतो. दर वर्षी ७० हजार स्त्रिया त्याने दगावतात. ‘एच.पी.व्ही’ नावाच्या विषाणूच्या १६ व १८ उपजातींचा संसर्ग स्त्रीच्या जननमार्गात झाल्यास त्या पैकी १ टक्का स्त्रियांना २० ते २५ वर्षांनी हा कर्करोग होतो. लागण झाल्यानंतर ८० टक्के स्त्रियांमध्ये तो आपोआप बरा होतो. पण चिघळलेली ‘एच.पी.व्ही’ लागण, जननमार्गात इतर जंतुलागण, वारंवार बाळंतपणामुळे जननमार्गाला होणारी इजा यांमुळे ‘एच.पी.व्ही’ बाधित स्त्रियांपैकी २० टक्के स्त्रियांमध्ये ही लागण चिघळून काहींना २० ते २५ वर्षांनी गर्भाशय-मुखाचा कर्करोग होतो. म्हणून ‘एच.पी.व्ही’ लागण होण्याआधी, म्हणजे लैंगिक समागम सुरू होण्याआधी ही लस दिल्यास ही लागण टळून कर्करोगाचे प्रमाण ७० टक्के घटते. म्हणून इतक्या लहान वयात ही लस टोचतात. 

भारतात विवाहपूर्व व विवाहबाह्य लैंगिक संबंध वेगवेगळ्या समाजघटकांत वेगाने वाढत आहेत. दुसरे म्हणजे, लग्नाआधी व नंतर पतीचे कोणाशी संबंध असतील ते अनेकींना माहीत नसते. माहीत असले, तरी ‘एच.पी.व्ही’ चाचणी’ असते; ती करून घ्यायला हवी हे माहीत नसते. माहीत असले, तरी ही चाचणी करुया, असे ती सहसा म्हणू शकत नाही. त्यामुळे गर्भाशय-मुखाच्या कर्करोगापासूनच्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी हे लसीकरण करायला हवे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com