
डॉ. मैथिली सावंत- saptrang@esakal.com
प्रख्यात बॅडमिंटन खेळाडू साईना नेहवालनं तिच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे कळवली. मागील वर्षी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याच्या घटस्फोटाचीसुद्धा चर्चा झाली होती. क्रिकेटपटू शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांच्याही घटस्फोटांच्या बातम्यांनी चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. ‘लव्ह रिलेशनशिप कोच’ म्हणून घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या व घटस्फोटाच्या वेदनादायी अनुभवातून जाणाऱ्या सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींचं भावविश्व मी फार जवळून अनुभवलं आहे. त्या अनुभवावर आधारित हा लेखप्रपंच!