

Films Division India Documentaries
esakal
फिल्म डिव्हिजन या संस्थेकडील लघुपटांचा संग्रह म्हणजे देशाच्या सामाजिक, साहित्यिक, वैज्ञानिक, कलात्मक इतिहासाच्या दृकश्राव्य पाऊलखुणा आहेत. केवळ भारतीयच नाही, तर परदेशातील नामांकित माध्यम वाहिन्या भारतीय सामाजिक, ऐतिहासिक तथ्य शोधताना, मांडताना या लघुपटांचा उपयोग करतात. हा महत्त्वाचा ऐवज तसा दुर्लक्षित आहे. अभ्यासक, माध्यमतज्ज्ञ, विद्यार्थी, सामाजिक राजकीय वर्तुळातील व्यक्ती, कलाकार आणि देशाचे सामान्य नागरिक अशा सगळ्यांनीच आवर्जून तिकडे वळून पाहिलं पाहिजे. त्यासाठीच फिल्म डिव्हिजनच्या गाजलेल्या लघुपटांची ही विशेष मालिका...
‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ अशा आताच्या आधुनिक काळात परस्पर संवाद, लेखन, माहिती, आर्थिक सामाजिक तसंच शासकीय व्यवहार आणि सर्व प्रकारचं चित्रपट गाण्यांचं दृकश्राव्य मनोरंजन असं मोठं जग तळहातातल्या स्मार्टफोन नावाच्या छोट्याशा उपकरणात दडलेलं आहे. चित्रपट, टीव्ही, रेडिओ, पुस्तकं, नियतकालिक, वृत्तपत्र अशी माध्यमं त्याच्या मूळ रूपात उपलब्ध आहेतच; पण त्या पलीकडे जाऊन आता दृकश्राव्य माध्यमांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा फायदा करून घेत आकर्षक रूपात तळहातावरील स्मार्टफोनवरही आपली उपस्थिती लावली आहे. थोडक्यात, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहिती मनोरंजनाची गंगा छोट्याशा फोनमधून घरोघरी वाहते आहे. हा काळ उदयाला आला त्यालाही आता काही वर्ष लोटली; परंतु या आधीच्या काळात माध्यमांची परिस्थिती कशी होती?