
श्रीराम पवार, shriram1.pawar@gmail.com
तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि त्यावर आधारित प्रगतीचा आणि अर्थकारणाचा थेट संबध असतो, हे वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यापासून वेळोवेळी दिसलं आहे. तंत्रज्ञनातील क्षमतांचा विकास करणं आणि इतरांना त्यापासून रोखणं हा केवळ आर्थिक बाबींपुरता किंवा तंत्रज्ञानातील सामर्थ्यापुरता मुद्दा उरत नाही, तो थेटपणे देशांच्या-जगाच्या व्यवहारावर प्रभाव टाकण्याच्या सामर्थ्याशी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाशीही जोडला जातो.