
स्थलांतर हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माणूस जन्मल्यापासून भटकंती करतो. यामध्ये कधी संस्कृतीच्या पाऊलखुणा तर कधी भौगोलिक प्रदेश त्याने स्वतःचा शोध घेतला. या सर्वांचा आढावा ‘स्थलांतरितांचे विश्व’मध्ये संजीवनी खेर यांनी घेतला आहे. एक मात्र आहे, माणूस कोठेही स्थलांतरित झाला तरी त्याची मूळ भूमी, संस्कृती त्याला साद घालत असते. माणूस नव्या ठिकाणी गेल्यावर तिथली संस्कृती, भाषा, राहणीमान स्वीकारून त्या भूमीला, संस्कृतीला तो आपलेसे करतो.