
हे समाजमाध्यम दुधारी तलवारीसारखे आहे. म्हटलं तर हातात शस्त्रही आहे आणि ते व्यवस्थित सांभाळलं नाही तर स्वतःलाच दुखापत होण्यासारखंही आहे. कधी शिखरावर तर कधी पायथ्याशी आपटणारे आहे. यातून सुवर्णमध्य साधायचा असेल तर व्यक्ती प्रतिष्ठा व्यवस्थापन (पीआर) चोख असायला हवे, एवढी जाण अव्वल आणि प्रतिष्ठित खेळाडूंना आहे. या पार्श्वभूमीवर ‘चांगला खेळ करीत राहिला तर कशाला हवा सोशल मीडियातील पीआर’ या वक्तव्यातून महेंद्रसिंग धोनीने अचानकपणे सर्वांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे.