Marathi Book Review : कल्पकतेच्या प्रवासाचा वाटाड्या; शिवराज गोर्ले यांच्या पुस्तकाचा सर्जनशील उहापोह

Creativity and Lateral Thinking in Marathi : 'एआय'च्या युगात कल्पकता हीच यशाची खरी गुरुकिल्ली ठरणार आहे. प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले यांचे ‘कल्पक व्हावं कसं?’ हे नवे पुस्तक वाचकांना सर्जनशीलतेचा मार्ग दाखवणारा एक उत्तम वाटाड्या ठरेल.
Creativity and Lateral Thinking in Marathi

Creativity and Lateral Thinking in Marathi

esakal

Updated on

अभय नरहर जोशी - abhay.joshi@esakal.com

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे...!

अशा शब्दांत कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब यांनी माणसाच्या कल्पकतेची-सर्जनशीलतेची महती गायली आहे. या कल्पकतेतून माणसानं नवनिर्मिती केली. नवनवे शोध लावले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हीसुद्धा माणसाच्या कल्पकतेतूनच निर्माण झालेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचं (एआय) वादळ सध्या सर्वच क्षेत्रांत घोंगावत आहे. मात्र, अशा या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात कल्पकता हीच यशाची गुरुकिल्ली असणार आहे. माणूस आणि अन्य प्राण्यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाला विलक्षण बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती लाभली आहे. त्याआधारेच माणसाने सृष्टीची अनेक रहस्य उलगडली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com