Marathi Book Review : वाघांच्या थरारक कथांचा संग्रह: 'कथा वाघांच्या' पुस्तकाचा आढावा

Tiger conservation and safari stories Maharashtra : ताडोबा, पेंच आणि मेळघाटच्या जंगलातील वाघांच्या थरारकथा आता पुस्तकरूपात! संजय करकरे लिखित ‘कथा वाघांच्या’ या संग्रहातून वाघांचे स्वभाववैशिष्ट्य, संवर्धन आणि जंगलविश्वाचा रंजक प्रवास उलगडला आहे.
Tiger conservation and safari stories Maharashtra

Tiger conservation and safari stories Maharashtra

esakal

Updated on

संपदा सोवनी - sampada.sovani@esakal.com

उन्हाळी सुट्टी आणि व्याघ्र सफारी हे एक समीकरण आहे. आपल्या राज्याला व्याघ्र अभयारण्यांचा मोठा वारसा लाभला आहे. वाघांच्या दर्शनाचा ऐन हंगाम सुरू झाला की, बातम्यांमधून त्यांची आकर्षक नावे वाचायला मिळतात. बिजली, मटकासुर, कॅटरिना, लारा, जय, गब्बर, रावण, मुन्ना, माया, ही सगळी नावे वाचकांना परिचितच आहेत. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले असो वा नसो, त्यांच्या दर्शनाच्या थरारकथा ऐकाव्याशा वाटतात. अशा ५१ कथा संजय करकरे यांच्या ‘कथा वाघांच्या’ या पुस्तकातून वाचकांच्या भेटीस आल्या आहेत.

करकरे यांचा वनांशी मोठा परिचय आहे. सृष्टी कंझर्वेशन फाउंडेशनमध्ये उपसंचालक म्हणून, तसेच बॅनियन ट्री फाउंडेशनमध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून नागपूरमधून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. तसेच, त्यांचा पिंड पत्रकाराचा. त्यामुळे ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, उमरेड या सर्व ठिकाणी त्यांनी भटकंती केली आहे. या भटकंतीतून वनाकडे, वाघांकडे पाहण्याची त्यांना प्राप्त झालेली दृष्टी या वाघांच्या कथांमध्ये उमटली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com