
प्रशांत ननावरे-nanawareprashant@gmail.com
साधारण दशकभरापूर्वीपर्यंत शहरांमध्ये रात्री नाक्यानाक्यावर काही माणसं अवतरायची. चार तास शांतपणे आपला व्यवसाय करून गायब व्हायची. ही माणसं कुठून यायची, त्यांच्याकडील माल कुठे तयार व्हायचा हे कदाचित आजतागायत अनेकांना ठाऊक नसेल; पण त्यांच्याकडील गोड चकतीवर ताव मारल्याखेरीज मध्यमवर्गीयांच्या दिवसाचा शेवट व्हायचा नाही.