

Maharashtra Varshiki 2026 Reference Book
esakal
स्वामित्व
लेखिका हेमा पाटील यांचा हा कथासंग्रह आहे. रोजच्या जगण्यातील विविध जाणिवांच्या कथांचा या पुस्तकात समावेश आहे. ‘स्वामित्व’, ‘चांदणं’, ‘सभा’, ‘परतफेड’, ‘परमानंद’, ‘परकी’ अशा विविध १३ कथा या पुस्तकात आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही वातावरणाचे दर्शन घडवणाऱ्या या कथा समकालीन वास्तवाचाही वेध घेतात. गूढ विश्वाचे वर्णन करणारी ‘स्वामित्व’, आध्यात्मिक मूल्ये सांगणारी ‘परमानंद’, स्त्रीजीवनाचे भाव मांडणारी ‘मुक्ती’ या कथा वाचनीय आहेत. मानवी संवेदनांचे सूक्ष्म चित्रण करतानाच रोजच्या जगण्यातील आव्हाने, तणाव यांचेही दर्शन या कथांतून दिसते. देवा झिंजाड यांची प्रस्तावना वाचनीय आहे.
वैशिष्ट्य : वैविध्यपूर्ण कथानके. वाचकाला अंतर्मुख करणारी लेखनशैली.
प्रकाशक : वेलवेट कविशा प्रकाशन, कल्याण पृष्ठे : १२० मूल्य : २६० रु.