

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीमराव रामजी आंबेडकर यांच्या कर्तृत्वाविषयी अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यात आवर्जून वाचलेच पाहिजे अशा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झालाय. अशोक गोपाळ यांचे इंग्रजीतील बाबासाहेबांचे चरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘लोकशाहीतला माणूस’ हे त्या पुस्तकाचे भाषांतर होय.