Chitti Book Review : जीवाभावाची 'चिट्टी': एका लेखिकेची आणि तिच्या श्वानमैत्रिणीच्या १३ वर्षांच्या सहवासाची भावस्पर्शी गाथा

Pet Stories Marathi : लेखिका 'सेरो' आणि तिची लाडकी श्वानमैत्रीण 'चिट्टी' यांच्यातील १३ वर्षांच्या निखळ मैत्रीचा आणि निसर्गाशी असलेल्या नातेसंबंधाचा हृदयस्पर्शी प्रवास.
Chitti Book Review

Chitti Book Review

esakal

Updated on

गौरी देशपांडे

आजची गोष्ट ही कथा नाहीय! ती आपली लेखिका ‘सेरो’ने तिच्या मैत्रिणीसोबत - चिट्टीसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचं कथन आहे!

लेखिका म्हणते, ‘‘चिट्टी! माझी जीवाभावाची मैत्रीण. माझ्यासोबत नसतानाही कायम माझ्यासोबत असणारी. तिच्याशी झालेली पहिली भेट अजून आठवते मला! पुण्यातली, पावसाळ्यातली ती एक वादळी रात्र होती. याच शहराच्या रस्त्यावर चिट्टीचा जन्म झाला. मनीषा नावाच्या माझ्या मैत्रिणीने चिट्टीला आपल्या घरात घेतलं. इवलूसं, पांढरंशुभ्र, गोजिरवाणं, मण्यांसारख्या काळ्याभोर, लुकलुकत्या, गंभीर आर्जवी डोळ्यांचं कुत्र्याचं पिल्लू!’’

‘‘तुला चिट्टी हवी आहे?’’ असं मनीषाने विचारताक्षणी मी हो म्हटलं आणि घेऊन आले तिला माझ्या कर्नाटकातल्या पश्चिम घाटातल्या जंगलामध्ये असलेल्या शेतघरात! मोठ्या जंगलात चिट्टीसारखं भित्रं, छोटं पिल्लू कसं काय जगेल याची मला जरा काळजीच होती. आणखी एक म्हणजे माझा ‘स्क्रॅबल’ नावाचा धटिंगण कुत्रा - त्याच्याशी गाठ होती तिची, पण बघता बघता हळूहळू चिट्टी रूळली इथे. मग तिला कितीतरी नावं मिळाली लाडाची - चिटकू, चिनचिन, नानीपट्टानी, मिस इडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com