Weaponssakal
सप्तरंग
शस्त्रोत्पत्ती
छोटी-मोठी, हलकी-जड, खंजीर, तलवारी, कुऱ्हाडी, भाले, गदा, ढाली, चिलखतं, बंदुकी, तोफा, अग्निबाण... काही विचारू नका!
- गिरिजा दुधाट, dayadconsultancies@gmail.com
मागच्या लेखात आपण पाहिलं की, माणसाला शस्त्रांची गरज का आणि कशामुळे भासू लागली आणि त्यातून माणसाचा शस्त्रप्रवास कसा सुरू झाला. माणूस उत्क्रांत होत असताना नावीन्य आणि वैविध्य यांची त्याला भारी हौस! या हौसेशी प्रामाणिक राहून माणसाने मध्ययुगात येईपर्यंत शस्त्रांची हे भली थोरली यादी तयार केली.
