
अक्षय शेलार
‘द मेहता बॉइज’ दृश्यरीत्या फारच मोहक आणि रोचक आहे. त्यात व्यक्ती, भूतकाळ आणि वेगवेगळ्या जागा यामधील संबंध फारच चपखलपणे येतात. शिव आणि अमय या दोघांचे अंधार व प्रकाशासोबतचे परस्परविरोधी नाते संघर्ष पेरणारे आहे. विविध रुपकांमधून शोक आणि एकाकीपणा दृश्यरीत्या, फारच सूक्ष्मपणे चितारला जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संवादांमधून प्रत्यक्षपणे व्यक्त न करता अव्यक्त भावना आणि मौनाचे क्षण यांमधूनही बरेच काही समोर येते.