Premium|Milam Glacier Trek : विस्मृतीत गेलेली 'मिलम हिमनदी' आजही का मानली जाते साहसप्रेमींसाठी सर्वात कठीण आव्हान?

Himalayan Glaciers : कुमाऊँ हिमालयातील ऐतिहासिक मिलम हिमनदीचा थरारक प्रवास, भोटिया समाजाचा व्यापार इतिहास आणि निसर्गाच्या रौद्र रूपाचे दर्शन घडवणारी ही विशेष गिर्यारोहण मोहीम; साहसप्रेमींसाठी निसर्ग, भूगोल आणि संस्कृतीचा अद्भूत संगम या लेखातून उलगडला आहे.
Himalayan Glaciers

Himalayan Glaciers

esakal

Updated on

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

मिलम हिमनदी सुमारे सोळा ते अठरा किलोमीटर लांबीची असून क्षेत्रफळ सुमारे सदोतीस चौरस किलोमीटर आहे. ती सुमारे पाच हजार पाचशे मीटर उंचीवर जन्म घेते आणि चार हजार मीटरपर्यंत उतरते. हिमनदीचा अग्रभाग सुमारे चार हजार दोनशे मीटरवर आहे. या उंचीमुळे तिचे स्वरूप अत्यंत रांगडे आणि भव्य दिसते.

हिमालयात काही ठिकाणी अशी शांतता असते जी शब्दांपेक्षा अधिक बोलकी वाटते. पर्वत, ढग, बर्फ आणि आकाश यांच्या दरम्यान उभे राहिल्यावर मनातील गोंधळ आपोआप निवळतो आणि निसर्गाची संथ लय ऐकू येऊ लागते. उत्तराखंडच्या कुमाऊँ विभागातील मुनस्यारी परिसरात पोहोचल्यानंतर अशीच एक भावना मनात दाटते. पंचचुलीच्या भव्य शिखरांकडे पाहत उभे राहिल्यावर हिमालयाची केवळ उंची नव्हे, तर त्याची खोलवर रुजलेली जीवनव्यवस्था जाणवते. याच परिसरातून, गोरी गंगा नदीच्या उगमाच्या दिशेने अनेक दिवसांचा पायी प्रवास केल्यानंतर भेटते ती मिलम हिमनदी; कुमाऊँ हिमालयातील सर्वांत मोठ्या, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि साहसप्रेमींसाठी अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या हिमनद्यांपैकी एक.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com