Premium|Milind Shinde acting journey : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात वाचनाची गोडी लागली; गजेंद्र अहिरेने दिला अनमोल ठेवा

Marathi Theatre and Cinema : अभिनेते मिलिंद शिंदे यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातील संघर्षाचे आणि 'ती फुलराणी' नाटक व गजेंद्र अहिरे यांच्या चित्रपटातील तारखांच्या ओढाताणीचे चित्रण केले आहे. करियरच्या वळणावरील निर्णयांची ही रंजक आणि भावूक कहाणी आहे.
Marathi Theatre and Cinema

Marathi Theatre and Cinema

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

‘‘डोंगर म्हातारा झाला’ ही कादंबरी वाचलीस का?’’ फोनवर गजेंद्र अहिरे होता... ‘‘नाही वाचली; पण वाचतो.. कुठे मिळेल?’’ यावर गजेंद्रनं जे उत्तर दिलं, ते माझ्यासाठी लाखमोलाचा आयुष्यभराचा ठेवा ठरलं. ‘‘दादर ईस्टला शारदा टॉकीजशेजारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आहे, तिथं मिळेल. तिथं पाच रुपयांत एक अखंड पुस्तक वाचता येतं... तिथं जा घे आणि वाच... वाचून झाल्यावर मला कॉल कर...’’ माझ्यासाठी कुणी पुस्तकांचा गडच उघडलाय, असं वाटू लागलं. अजूनही कधी कधी तिथून जाताना गजेंद्रनं सांगितलेला सविस्तर पत्ता आठवतो.

मोहन वाघ की विनय आपटे?

दोन्ही मोठी नावं.

चंद्रलेखा की गणरंग?

दोन्ही मोठ्या संस्था

कुणासोबत जावं डोक्याचं ड्रिलिंग मशीन झालं होतं. कुणाला सांगता येत नव्हतं. घरच्यांना तर काहीच नाही. सगळे मित्रही एका निर्णायक वळणावर येऊन थांबले होते. त्यांनाही त्यांचं ठरवायचं होतं. त्यांचीही स्वतःची अशी व्यवधानं होतीच. मी डोक्यात ड्रिलिंग मशीन घेऊन फिरत होतो. ३७, ३९, ६३ या नंबरच्या बसमधून प्रवास करत होतो; पण जात कुठेच नव्हतो. ठरत काहीच नव्हतं. धुम्मस मशीन डोक्यात आवाज करत होती. डोक्यात, मनात कुणासोबत जायचं याचं आंदोलन माजलं होतं. दोन्ही मनात ‘तह’ काही होईना.

चंद्रलेखा (ती फुलराणी) कंपनीचा बारा दिवसांचा गोवा दौरा म्हणजे नव्यानं सुरू झालेलं गणरंग कंपनीचं नाटक (कथा अरुणाची) ते बारा दिवस थांबणार, थांबवावं लागणार. हे त्या नवीन नाटकाच्या आरोग्याला पोषक नव्हतं. त्याचं त्याला ठरवायचंय... ‘फुलराणी’ केलं तर ‘अरुणा’ थांबवावं लागणार. निर्णय त्याला घ्यायचाय. दोन्ही पर्याय आम्हाला चालतील आणि ‘अरुणा’ केलं तर ‘फुलराणी’ बंद... सोबत आलास तरी, नाही आलास तरी...

विनय सरांनी स्फटिक घासून स्वच्छ केला...

सरांनी सोपं केलं.

निर्णय काही होईना.

मनाचं काही ठरेना. मनातलं आंदोलन काही शमेना...

तीन तीन मिनिटानं कॉल वाढवायला लागणाऱ्या एका सार्वजनिक टेलिफोन बूथवरून तयारी करून वामन केंद्रे सरांना फोन केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com