
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
ऑझगुड पर्किन्सचा ‘द मंकी’ पाहताना एका सरळसोट भयपटाच्या विश्वात शिरतोय असं सुरुवातीला वाटतं; पण चित्रपट जसजसा उलगडत जातो, तसतसा त्याचा स्वर अधिक गुंतागुंतीचा असल्याचं जाणवतं. स्टीव्हन किंगच्या ‘द मंकी’ याच नावाच्या कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे.