Shri Vasudevananda Literature : श्रीवासुदेवानंद सरस्वतींच्या वाङ्‍मयाची शब्दसूची

Shrivasudevanand Saraswati Tembe Swami Literature Study : श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या विपुल मराठी व संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासासाठी 'चिकित्सक शब्दसूची' प्रकाशित झाली असून, मानवी जीवनात शब्दांचे सामर्थ्य आणि ऋतंभरा प्रज्ञेचे महत्त्व उलगडणारा हा एक विशेष लेख.
Shrivasudevanand Saraswati Tembe Swami Literature Study

Shrivasudevanand Saraswati Tembe Swami Literature Study

esakal

Updated on

केदार भारद्वाज - saptarang@esakal.com

श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) महाराज यांच्या मराठी व संस्कृत भाषेतील विपुल वाङ्‍मयाचा अभ्यास करणे सर्वांसाठी अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने त्यांच्या ग्रंथांची मराठी अर्थासह चिकित्सक शब्दसूची प्रकाशित करण्यात आली आहे.

व्याकरणाच्या विद्वानांनी शब्दाला ब्रह्माएवढे महत्त्व दिले आहे. एखादा शब्द खऱ्या अर्थाने समजला, तर त्याचा उच्चार करणाऱ्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो. एवढेच नव्हे, तर त्याला सर्व गोष्टी, अर्थात परमानंदाची प्राप्ती होते. शब्द कसा असावा याबद्दल शास्त्रकारांनी सुंदर व्याख्या केली आहे. सहाणेवर चंदन घासल्यानंतर सुगंध येतो. त्या सुगंधाने शरीराला, मनाला, बुद्धीला आनंद होतो; त्याप्रमाणे शब्द हा मानवाला आनंद देणारा असावा. अज्ञान दूर करून, ज्ञान प्राप्त करून देणे, असे शब्दांचे सामर्थ्य आहे. जीवनाचा साक्षात्कार करण्याचे सामर्थ्य, जीवनाचे अंतिम तत्त्व ओळखण्याची शक्ती ही शब्दरूपी वाङमय ग्रंथांमध्ये असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com