फाळणी होऊन दहा वर्षं झालेली आहेत. प्रौढ मतदानाचा अधिकार मिळालेल्या भारतीयांनी जात-धर्म-भाषा वगैरेंचा विचार न करता मतदान केलं. अशा वातावरणात ‘हिंद १९५७’चं कथानक घडतं. दिग्दर्शक फिरोझ अब्बास खान यांना ‘फेंसेस’ नाटकात फाळणीनंतर भारतात राहिलेल्या गरीब मुसलमान कुटुंबाची समांतर कथा दिसली. त्यांनी त्याला भारतीय बाज चढवला आणि एक अंतर्मुख करणारं नाटक जन्माला आलं...