- डॉ. आशा मुंडे, drashamunde@gmail.com
मराठवाडी बोली इथल्या प्रत्येक जिल्ह्यात काहीशी वेगळी ऐकू येते. नांदेड-लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड... प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्यपूर्ण शब्द, वाक्प्रचार आहेत. कुठे कानडी आणि तेलुगूचा प्रभाव, कुठे उर्दूचा, कुठे नगरी बोलीतला हेल, तर कुठे खान्देशी शब्दांची सरमिसळ. सगळीकडचा खणखणीतपणा आणि गोडवा सामावून घेऊन ‘मराठवाडी’ बोलीने आपले वेगळेपण टिकवले आहे.