

सुलभा तेरणीकर saptrang@esakal.com
बोलपटांच्या आगमनाने मूकपटांसाठी उभारलेले स्टुडिओ, थिएटर्स तीसच्या दशकात नव्या दिमाखाने उभे राहू लागले. मुंबईबरोबरच कोल्हापूर, पुणे, सांगली, नाशिक, इथंही उभे राहिले. काही वास्तू, कलाकार, यंत्रसामग्री, माणसं एकाएकी निरुपयोगी झाली, तर दुसरे बोलपटांचे विश्व नवयुवतीसारखे सजले. मूकपट, ग्रामोफोनचे तबकड्यातले संगीत, लुप्तप्राय झाले. पुण्याच्या क्षितिजावर मात्र ‘प्रभाततारा’ नव्या तेजाने चमकू लागला... साल १९३४.