
केदार फाळके - editor@esakal.com
जिजामाता आणि शिवाजी राजे पुणे परिसरातील मुकाशांचा कारभार पाहात असताना पुणे आणि खेड येथे राहात असत. खेड येथे वाडा बांधण्याकरिता वाणी लोकांची जागा घेतली होती, त्याबदल्यात त्यांना इतरत्र जागा दिली. काही काळ त्यांचे खेडच्या बापूजी मुद्गलांच्या वाड्यात वास्तव्य होते. पुण्यात त्यांचा वाडा होता. हा वाडा म्हणजे प्रसिद्ध लाल महाल होय.