
शिल्पा कांबळे-shilpasahirpravin@gmail.com
मात पडलेली स्त्री तुम्ही पाहिलीय का कधी?... निर्सगाने स्त्रियांना सौंदर्याचे वरदान दिलेले आहे. प्रेमात पडलेली स्त्री तर अंतर्बाह्य सुंदर दिसते. प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक चमक येते. हालचालींमध्ये उत्साह येतो. आनंदाचा झरा तिच्या हृदयातून वाहू लागतो. पण आपल्या समाजात प्रेमाला प्रतिष्ठा आहे का? नाहीच नाही! मला आमच्या शेजारी राहणारी एक मुलगी आठवतेय. दहावीत असावी.