Existentialism in Marathi Literature : प्रकाशाच्या झगमगाटात अंधाराचा शोध: श्याम मनोहर यांचा लेख

Shyam Manohar Saptrang Article : प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत मानवी प्रगती, विज्ञानाचा झगमगाट आणि अंतर्मनातील अंधार यांतील संघर्षाचा वेध घेतला आहे. "आदर्श सभ्यता अजून जन्मलेलीच नाही," असे म्हणत त्यांनी आधुनिक जगण्यातील विसंगतीवर मार्मिक भाष्य केले आहे.
Shyam Manohar Saptrang Article

Shyam Manohar Saptrang Article

esakal

Updated on

श्‍याम मनोहर - saptrang@esakal.com

निर्जीवांच्या आत अंधार असतो. पृथ्वीच्या आत अंधार असतो. अंतराळात अंधार असतो. सजीवांच्या आत अंधार असतो. अंधारातर्फे पृथ्वीवरचे सर्व एकमेकांशी विश्वाशी जोडलेले असतात. अंधार हे मूळ तत्त्व?

व्यक्ती हसत म्हणते, ‘‘मला अंधार बघायचाय.’’ बघ की!

कसा बघायचा? बघणे, पाहाणे ह्याचे विज्ञान माहिताय ना? वस्तूवर प्रकाश पडतो, तो वस्तूवरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांत जातो आणि वस्तू दिसते... अंधार बघायचा म्हणजे अंधारावर प्रकाश टाकला पाहिजे. व्यक्ती आपल्या विनोदावर खूप हसते.

आपले डोळे प्रकाशासाठी आहेत. अंधार बघायचा असेल, तर डोळे फोडले पाहिजेत. नको... नको... नाही!

तत्त्वज्ञान म्हणजे, अज्ञान म्हणजे अंधार. ज्ञान म्हणजे प्रकाश. अंधाराला सौंदर्य नसते. अंधारात ऊर्जा नसते. अंधाराचा काहीच उपयोग नाही. अंधार निरुपयोगी? अंधार नष्टच करायचा.

व्यक्तीने घरात, दारात, रस्त्यात दिवे लावले, रोषणाई केली. प्रकाशाचा झगमगाट! जा, जा, अंधारा... व्यक्तीने उघडमिट करणारे दिवे लावले. एकदा प्रकाश, एकदा अंधार! एकदा प्रकाश, एकदा अंधार! रंगबेरंगी दिवे - एकदा ह्या रंगाचा प्रकाश, एकदा दुसऱ्या रंगाचा प्रकाश. व्यक्ती अंधाराला चिडवते. अंधाराला एकच रंग. काळा आणि न दिसणारा.

व्यक्तीने दिसणारा काळा रंग निर्माण केला.

अंधारा, तुझा रंग आम्ही तयार केलाय आणि तो काळा रंग आम्ही पाहू शकतो. हुर्रेऽऽ.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com