
हृदयनाथ मंगेशकर - editor@esakal.com
मी खोलीत बसलो, तंबोरा सुरात लावून पहाटेपर्यंत अनेक गुरुंकडून घेतलेल्या बंदिशी मनात घोळवत बसलो. पण मला हवी असलेली सुरावट जी वाद्याशिवाय आपल्या पायावर समर्थपणे उभी राहील, अशी मिळाली नाही. पहाट झाली, सकाळ झाली, चहासाठी गडबड सुरू झाली, पण, पण... मला हवी असलेली सुरावट मला काही मिळाली नाही.