Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!

Cold War Chess Rivalry US vs Russia : गंमत म्हणून खेळणाऱ्यांसाठी खेळ, तर आयुष्य पणाला लावणाऱ्यांसाठी शास्त्र असणाऱ्या बुद्धिबळाच्या पटावरील मानवी मानसिकता आणि योग्य पालकत्वाचा वेध घेणारा, बॉबी फिशर व बालकलाकार जोशच्या कथेवर आधारित विशेष लेख.
Cold War Chess Rivalry US vs Russia

Cold War Chess Rivalry US vs Russia

esakal

Updated on

सुहास किर्लोस्कर

बुद्धिबळ काय आहे? प्रशिक्षकांच्या मते, गंमत म्हणून खेळणाऱ्यांसाठी तो एक गेम आहे आणि त्याकरिता आयुष्य पणाला लावणाऱ्यांसाठी ते एक शास्त्र आहे. एकाच विषयावर अनेक चित्रपट- डॉक्युमेंट्री बघितल्यानंतर त्या विषयाचे विविध पैलू समजतात. चित्रपट समजण्यासाठी बुद्धिबळातील बारकावे माहीत असण्याची गरज नाही. चित्रपट बुद्धिबळाच्या खेळासंबंधी, खेळाडूच्या मानसिकतेविषयी, विजेते कसा वेगळा विचार करतात, यासंबंधी जगज्जेत्यांच्या जडणघडणीविषयी आहे.

बॉबी फिशर या महान बुद्धिबळपटूचा टेबलवर फोटो दिसतो, त्यापुढे बुद्धिबळाचा पट, त्यावर काही प्यादी ब्लॅक अँड व्हाइटमध्ये दिसतात आणि आपल्याला एका लहान मुलाचा आवाज ऐकू येतो. तो जणू आपल्या कानात एक गोष्ट सांगतो आहे.  ‘‘त्या दिवशी सगळेजण वाट बघत होते, तो आज येणार की नाही?  तो त्या ठिकाणी (बुद्धिबळाची मॅच खेळायला) अजून आला नव्हता. अमेरिकेचा सेक्रेटरी ऑफ द स्टेट हेन्री किसिंजर याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा निरोप सांगितला, देशाचा सन्मान राखण्यासाठी तू जरूर खेळ, तो सामना खेळण्यासाठी आला... पण फोटोग्राफर्सची गर्दी बघून नाराज झाला.  तो जिंकला असता तर पहिला अमेरिकन वर्ल्ड चॅम्पियन झाला असता आणि हरला असता तर? .....आणि बॉबी फिशरने बुद्धिबळ सामना जिंकला, अमेरिकन जनतेचे मनही जिंकले. कारण त्यावेळी रशियाला सर्व क्षेत्रांत हरवणे हे प्रत्येक अमेरिकन व्यक्तीचे स्वप्न होते.  पुढे काय झाले माहितीये?’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com