

Maratahi Theatre Influence on Contemporary Visual Artists
esakal
घरात रंगभूमीचे वातावरण सर्वांत जास्त होते, मात्र त्यात सहभागी न होता त्यांनी तिथून संवेदनशीलता मनात रुजवली... अशा व्यापक विचार करणाऱ्या शकुंतला कुलकर्णी सुरुवातीला अमूर्त विषयावर काम करायच्या तेव्हा रंग, आकृती आणि रिकाम्या जागा यातच त्या रमायच्या. त्यानंतर साहित्य वाचनाचा आणि जीवनानुभव यांचा परिणाम त्यांच्या कामावर दिसू लागला. मला माणसांना पडणारे प्रश्न जाणवू लागले.’ फ्रान्झ काफका आणि अल्बर्ट कामू यांच्या लेखनाचा त्या विशेष उल्लेख करतात. त्यांच्या चित्रात व्यक्तीं, व्यक्तींचे गट, त्यांच्या चिंता मानसिक अथवा शारीरिक प्रश्नांसकट येऊ लागल्या.
मी स्टेजवर रुळेन असे मला वाटले नव्हतं. मी नेहमी प्रेक्षकांच्या भूमिकेतच असायची,’ शकुंतला कुलकर्णी म्हणाल्या. ‘मी प्रेक्षक’ हे त्यांच्या बोलण्यात वारंवार येते. ते स्टेजपासून दूर पळण्यासाठी नव्हे तर त्याच्याशी एकरूप होण्यासाठी. एक कलाकार म्हणून त्यांच्या कामात आज ड्रॉइंग, इन्स्टॉलेशन, स्टेजसंबंधी काम आणि हलत्या प्रतिमा यांची रेलचेल असते. पण या सर्वांची सुरुवात जाणीवपूर्वकही झाली नाही आणि सुलभ सलगपणेही नाही. त्या एकूण कलाजीवनात समरसून सहभागी होत गेल्या.