Premium|Maharashtra Kushti History and Legacy : लाल मातीची ताकद आणि मल्लविद्येचा वारसा; महाराष्ट्राच्या कुस्तीचा श्रीपती खंचनाळेंपासून ते आजपर्यंतचा रंजक प्रवास

Traditional Indian Wrestling Mud Akhada : पौराणिक काळापासून छत्रपती शाहू महाराजांच्या राजाश्रयापर्यंत आणि खाशाबा जाधवांच्या ऑलिम्पिक पदकापासून ते आजच्या महिला पैलवानांच्या शड्डूपर्यंत, महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्तीच्या दैदिप्यमान प्रवासाचा घेतलेला हा एक अभ्यासपूर्ण वेध.
Traditional Indian Wrestling Mud Akhada

Traditional Indian Wrestling Mud Akhada

esakal

Updated on

अशोक निंबाळकर

कुस्ती म्हणजे लाल मातीतील रांगडा खेळ. या मल्लविद्येला पौराणिक इतिहास आहे. हनुमान, कृष्ण-जरासंध, भीम हे त्यात पारंगत असल्याचे दाखले पुराणात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने अनेक मल्लांनी कुस्तीच्या आखाड्यात, युद्ध मैदानात शौर्य गाजवले. पुढे शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय दिला. कोल्हापूरच्या खासबाग मैदानाने पैलवानांना सर्वाथाने बळ दिलं. गावोगावच्या आखाड्यांमुळे ही लाल माती आणखीच ‘सुपीक’ केली. ‘महाराष्ट्र केसरी’, ‘हिंद केसरी’ स्पर्धेमुळे कुस्तीला ग्लॅमर आले. ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले ते सातारच्या खाशाबा जाधव यांनी.

देशात आतापर्यंत ३९ ‘हिंद केसरी’ झालेत. त्यातील दहा महाराष्ट्राचे आहेत. यावरून महाराष्ट्राच्या लाल मातीच्या ताकदीचा अदमास यावा. श्रीपती खंचनाळेंपासून सुरू झालेला प्रवास सातारमध्ये झालेल्या ‘हिंद केसरी’ महेंद्र गायकवाडपर्यंत आलाय. हिंद केसरी मारुती माने, रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार, दख्खन का काला चिता छबूराव लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव व विजय चौधरी, स्टार मल्ल सिकंदर शेख आदींच्या कुस्त्यांनी देशभरातील आखाडे गाजवले. शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, माउली जमदाडे, पृथ्वीराज पाटील, जयदीप पाटील, विक्रम भोसले, सुदर्शन कोतकर, बाळू बोडखेसारख्या मल्लांनी दबदबा निर्माण केलाय. संघटनेचं जाळं उभारून कुस्तीला बळ दिलं ते मामासाहेब मोहोळ यांनी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com