New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

Marathi Books : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडच्या प्रवासापासून ते प्रदीप दीक्षितांच्या कवितांपर्यंत आणि गंगाखेड ते लंडन असा प्रवास करणाऱ्या डॉक्टरच्या संघर्षगाथेसह 'सिंधी' विस्थापितांच्या फिनिक्स भरारीचा वेध घेणारा विशेष पुस्तक परिचय लेख.
New Marathi releases

New Marathi releases

esakal

Updated on

खेडूत ते क्रिकेटर

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋतुराज गायकवाडचा संपूर्ण प्रवास ‘खेडूत ते क्रिकेटर - ऋतुराज गायकवाड’ या पुस्तकात उलगडून दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड यांनी स्वतःच या पुस्तकाचे लेखन केले आहे. एका छोट्याशा खेड्यातून क्रिकेटची कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या घरातून आलेला मुलगा थेट भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय खेळतो, ही सोपी गोष्ट नाहीच. त्याचा संपूर्ण प्रवास, मार्गात आलेल्या अडचणी, मिळालेल्या संधी, क्रिकेटच्या प्रवासातील टप्पे... यांसह विविध घटकांवर सविस्तर लेखन करण्यात आले आहे. पुस्तकाची मांडणी आकर्षक आहे.

  • वैशिष्ट्य : ऋतुराजच्या कामगिरीची आकडेवारी, छायाचित्रे, पुरस्कार व इतर संदर्भ

  • प्रकाशक : श्रीगणेश प्रकाशन, पुणे

  • पृष्ठे : १२०, n  मूल्य : ६०० रु.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com