Student Journey from Science to Arts Stream : 'सायन्स सोडलं आणि कल्याणात बातमी पसरली...' वाचा, चौकटीबाहेरचा मार्ग निवडणाऱ्या एका मुलाची गोष्ट!

Indian Education System and Career Choices : मेंढरासारखे सायन्सला जाऊन जीव घुसमटण्यापेक्षा नातेवाइकांच्या आणि मित्रांच्या पालकांच्या रोषाला पत्करून 'कला' (Arts) शाखेत प्रवेश घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या बंडखोर, धाडसी आणि स्वाभिमानी आत्मशोधाचा रंजक वेध.
Student Journey from Science to Arts Stream

Student Journey from Science to Arts Stream

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

आपण स्वतंत्र अस्तित्व आहोत, वेगळी व्यक्ती आहोत आणि आपल्या काही आवडीनिवडी आहेत, हे वयाच्या एका टप्प्यावर जाणवू लागतं. मग मन बंड करतं, आपला मार्ग शोधू लागतं. काही जण हा मार्ग शोधत जातात, वाटेत जे अडथळे लागतील ते तुडवत जातात, तर काही तसे जात नाहीत किंवा त्यांना विविध कारणांनी जाता येत नाही. ते आहे तोच मार्ग चोखाळतात. त्यामुळे प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो. पण कधी ना कधीतरी प्रत्येकालाच या बंडखोरीच्या ज्वाळांची धग लागलेली असते, त्यांची ऊब हवीहवीशी वाटलेली असते.

मी दहावीला असताना चांगले गुण पडले की बाकी कुठेही न पाहता विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा हा तेव्हाचा शिरस्ताच होता. मीही मेंढराप्रमाणे तोच पाळला आणि सायन्सला गेलो. पण जसजसे वर्ग सुरू झाले, तसतसा जीव घुसमटू लागला. मला भौतिकशास्त्र आवडायचं, पण भाषेचे विषय सुटले होते... आणि मला तेच तर जास्त आवडायचे. केमिस्ट्री आणि माझं काही केल्या गणित कधी जुळलं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com