yugandhar shivray book
sakal
- मधुबन पिंगळे, madhuban.pingle@esakal.com
आयुष्याच्या प्रत्येक अंगाचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराज कालातीत आदर्श ठरतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यातही आधुनिक जीवनशैलीचा विचार करतानाही शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये घेतलेले निर्णय व कृती या आजही लागू होतात, हे अनेक वेळा दिसून आले आहे. डॉ. सुमंत टेकाडे यांच्या ‘नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ युगंधर शिवराय’ या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मितीमागील प्रभावी नियोजन आणि यशस्वी व्यवस्थापन यांचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला असून, डॉ. श्याम धोंड यांनी चोख पद्धतीने संपादन करीत मर्यादित शब्दांमध्ये मांडणी केली आहे.