- शिल्पा कांबळे, saptrang@esakal.com
स्त्रियांच्या कष्टांचे, निश्चयाचे, सर्जकतेचे आणि बंडखोरीचे गोडवे आपण वारंवार गातो. पण मी आज माझ्या आजूबाजूच्या सुखवस्तू स्त्रियांकडे पाहते, तेव्हा ‘बंडखोरी केली म्हणजे काय?’ हे कितीतरी जणींना माहितीच नसल्याचे लक्षात येते. सर्व काही बरे चाललेले असताना अनेकींच्या समोरचा कळीचा प्रश्नच वेगळा आहे!