

Marathi Literature Books 2026
esakal
संतपरंपरेचा चिरंतन संदेश अभंगशैलीतून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजेच डॉ. संजय उपाध्ये यांचे ‘विवेकसंहिता’ हे छोटेखानी पुस्तक. छोट्याशा आकारातील देखण्या स्वरूपाचे हे पुस्तक आपल्या सुंदर मुखपृष्ठाने वाचकाचे लक्ष वेधून घेते. विविध विषयांवर साध्या, सोप्या, पण मार्मिक शब्दांत अमूल्य ज्ञान देणारे १०१ अभंग सुविचार उपाध्ये यांनी या पुस्तकात लिहिले आहेत. संतवचनांच्या तेजस्वी दिव्यपथावर प्रत्येकाला सुखाने वाटचाल करता येईल असा प्रकाश देणाऱ्या या रचना वाचकाला अंतर्मुख करतात, नवी प्रेरणा देतात आणि रोजच्या जगण्यातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मार्गही दाखवतात. अक्षरांचा संग । माध्यम व्यक्तांचे । मौन अव्यक्ताचे । भाव सांगे ।। असं म्हणत ‘अक्षरांच्या संगाने’ मांडलेली ही पथदर्शी विवेकसंहिता आवर्जून वाचायला हवी व चिंतनात ठेवावी अशी आहे.
वैशिष्ट्य : अभंगशैलीतून विविध विषयांवर केलेले भाष्य. पुस्तकाची नावीन्यपूर्ण व कलात्मक मांडणी
प्रकाशक : डॉ. संजय उपाध्ये
पृष्ठे : १३० मूल्य : २५० रु.