Marathi Book : स्वागत नव्या पुस्तकांचे

Travelogue USA Europe : विवाहाचे कायदेशीर आणि भावनिक पदर उलगडणारी ‘विवाहाची वहिवाट’, अमेरिका-युरोपची सांस्कृतिक सफर घडवणारे ‘मनोमय’, जगण्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे ‘हटके सोचो’ आणि गणितासह जीवनानुभवांची गुंफण करणारा ‘कवि कल्पना विलास’ या पुस्तकांचा विशेष परिचय.
Travelogue USA Europe

Travelogue USA Europe

esakal

Updated on

विवाहाची वहिवाट

घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून... असं आपल्याकडे म्हटलं जातं. जीवनातील एक महत्त्वाचे वळण म्हणजे विवाह. आयुष्याची नवी सुरुवात म्हणजे विवाह. आयुष्यात या टप्प्यावर येताना मनात अनेक प्रश्‍न येतात, अडचणी येतात. त्याबाबतची सविस्तर माहिती म्हणजे डॉ. प्रवीण मोतीवाला यांचे ‘विवाहाची वहिवाट’ हे पुस्तक. विवाह व जोडीदाराची विवेकी निवड, नाते जन्मपत्रिकेवरून, वैवाहिक जीवनातील शारीरिक संबंध, सुखी संसाराचे अर्थकारण, पालकत्व यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसह कौटुंबिक न्यायालय, घटस्फोट, पोटगी, स्त्रीधन, मुलांचा ताबा, लिव्ह इन रिलेशनशिप या कायदेशीर बाबींवरही डॉ. मोतीवाला यांनी सहज-सोप्या शब्दांत संदर्भांसह मांडणी केली आहे. त्यामुळे वाचकाला तो घटक समजणे सोपे होते.

वैशिष्ट्य : डॉ. उल्हास लुकतुके यांची प्रस्तावना व अनेक मान्यवरांचे अभिप्राय.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे पृष्ठे : १२८, मूल्य : २५० रु.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com