Tribal Resistance Literature

Tribal Resistance Literature

esakal

New Marathi Book : जमिनीसाठी झगडणाऱ्या मतीची गोष्ट

Tribal Resistance Literature : आपल्या हक्काच्या जमिनीसाठी खंबीरपणे उभ्या ठाकलेल्या छत्तीसगडमधील 'मती' या चिमुरडीची आणि तिच्या लढाऊ आजीची ही गोष्ट, पर्यावरणाप्रती असलेली संवेदनशीलता आणि न्यायासाठीचा लढा अधोरेखित करते.
Published on

गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com

शाळेतून आल्या आल्या मती घरामागच्या दोन शेतांकडे पळाली. तिचे बाबा आणि आजी जमिनीतून बटाटे काढत होते. बटाटे काढून एका छोट्या टोपलीत ठेवायचे, ती भरली की, शेताच्या बांधावरल्या दोन मोठ्या डालग्यांमध्ये रिकामी करायची.

बाबा आणि आजी नको नको म्हणत असताना, ‘‘मी पण मदत करणार’’ असं म्हणत, पूर्ण भरलेली टोपली मतीने उचलली. एवढी जड टोपली घेऊन ना तिला नीट चालता येत होतं, ना आपण नेमकं कुठे जातोय ते कळत होतं. शेवटी जे व्हायचं होतं ते झालंच. ती आणि टोपलीतले बटाटे अस्ताव्यस्त पडले! आलेलं रडू आवरत, बाबांची सूचना ऐकत पुढच्या वेळी तिने अर्धी भरलेली टोपलीच उचलली आणि मग दोन्ही मोठ्या टोपल्या भरूनही टाकल्या!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com