

JRD Tata Vision
esakal
महेश बर्दापूरकर - saptrang@esakal.com
एखादी व्यक्ती, संस्था यशस्वी होते, जागतिक होते, तिचे नाव जगभरातील लोकांच्या मनावर कायमचे कोरले जाते, तेव्हा अशी व्यक्ती किंवा संस्था नक्की कसे काम करते हे अनुभवायचे असल्यास ‘मेड इन इंडिया ः ए टायटन स्टोरी’ तुमच्यासाठी आहे. भारतातील हुशार लोकांनी जगासाठी तयार केलेल्या उत्पादनाची ही प्रेरणादायी कथा तुम्हाला नक्कीच अचंबित करेल!
जो वक्त को बदलने की काबिलियत रखते है, वह व्हिजनरी होते है और उनकी सोच हमेशा वक्त के दो कदम आगे रहती है...‘मेड इन इंडिया ः ए टायटन स्टोरी’ या रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित वेब सिरीजमधील हे सुरुवातीचं वाक्य...यातील एका प्रसंगात टाटाचे सर्वेसर्वा जेआरडी टाटा आपल्या ‘टायटन’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झेरक्सेस देसाई यांना ‘टायटन’च्या भारतातील घवघवीत यशाबद्दल बक्षीस देतात, मात्र देसाई ‘मी फक्त भारतात यशस्वी झालो आहे, जगभरात ‘टायटन’चे नाव होईल तेव्हाच मी बक्षीस घेईल,’ असे सांगत बक्षीस नाकारतात. एखादी व्यक्ती, संस्था यशस्वी होते, जागतिक होते, तिचे नाव कायमचे जगभरातील लोकांच्या मनावर कोरले जाते, तेव्हा अशी व्यक्ती किंवा संस्था नक्की कसे काम करते हे अनुभवायचे असल्यास ‘ए टायटन स्टोरी’ तुमच्यासाठी आहे...