या देखण्या कविता संग्रहातली अगदी शेवटची कविता एखाद्या झोक्यासारखी अलगद उंचीवर जाते आणि तितक्याच लयीने सावकाश जमिनीवर येते. आयुष्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहताना, भवतालची निरीक्षणे न्याहाळताना कवीच्या नजरेनं टिपलेली प्रसन्न चित्रे आपल्याला संग्रहात ठिकठिकाणी दिसतात, आपल्याशी संवाद साधतात. कवी संकेत म्हात्रे याच्या या कविता संग्रहाचे प्रसन्न जलरंगात चितारलेलं मुखपृष्ठ सर्वप्रथम आपले मन आणि नजर खिळवून ठेवते.