esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सकाळी ७.५४, चंद्रास्त रात्री ९.१८, मु. जिल्हेज मासारंभ, पारशी अस्पंदार्मद मासारंभ, भारतीय सौर आषाढ २१ शके १९४३.

हेही वाचा: राज्यातील शेतकरी मुंबईच्या सीमा रोखणार ?

दिनविशेष -

 • १८६४ : इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्म. भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इत्यादी विषयांवरही त्यांनी संशोधन, लेखन केले.

 • १९६१ : मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत धरण फुटून पुणे शहराला महापुराचा तडाखा बसला. नदीकाठच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील घरे, दुकाने, बॅंका, शाळा, ग्रंथालये आदींना पुराचा तडाखा बसून मोठी हानी झाली.

 • १९९४ : हिंदी व मराठी चित्रपट क्षेत्राचा चालता बोलता इतिहास, ज्ञानकोश म्हणून गौरविले जाणारे प्रसिद्ध पटकथालेखक व ‘बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे संचालक वसंत साठे यांचे निधन. कथा, पटकथालेखक, समीक्षक, जाहिरातदार, निर्माता अशा विविध क्षेत्रांत त्यांचा वावर होता.

 • १९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

 • १९९९ : ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावसकर यांना प्रदान.

हेही वाचा: मुंबई: व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा

दिनमान -

 1. मेष : तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 2. वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 3. मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

 4. कर्क : निर्णय अचूक ठरतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

 5. सिंह : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. जबाबदारी येऊन पडण्याची शक्यता आहे.

 6. कन्या : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

 7. तूळ : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 8. वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 9. धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

 10. मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

 11. कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.

 12. मीन : आर्थिक सुयश लाभेल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

-- प्रा. रमणलाल शहा

loading image