
बंडू दातीर- saptrang@esakal.com
राज्यातल्या अनेक खेडेगावामधला युवक सोशल मीडिया आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मृगजळी राजकारणात अडकतोय. शेतात राबण्यापेक्षा नोकरीच्या पाठीमागे धावतोय. भविष्याची चिंता नसल्याने दिशाहीनपणे भरकटतोय. परंतु काशिग (ता. मुळशी) गावातील युवकांनी आपापल्या जागेत डोंगराळ, मुरमाड माळरानावर कष्टानं कृषी पर्यटन केंद्रांची नवी वाट निर्माण केली आहे. हे हिरवंगार नंदनवन देश-विदेशातील पर्यटकांचे रेसिडेन्शियल डेस्टिनेशन झाले आहे. युवकांची एकजूट, पर्यटनाच्या माध्यमातून वाढलेले जोडधंदे आणि ग्रामस्थांची साथ यामुळे बारा वर्षांतच युवाशक्तीने अर्थचक्राला गती दिली.