Premium|Time management mindset : तुमच्या करिअरमध्ये उरलेत फक्त २००० आठवडे! वेळेची किंमत सांगणारी 'W2K' ची नवी डोळे उघडणारी संकल्पना

Working 2000 Weeks Career Time Management Concept : व्यावसायिक आयुष्यातील अवघ्या दोन हजार आठवड्यांच्या मर्यादेची जाणीव करून देत, पैशाप्रमाणेच वेळेचे अचूक नियोजन करून आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि उत्पादक बनवण्याचा संदेश देणारा हा एक विशेष वैचारिक लेख आहे.
Working 2000 Weeks Career Time Management Concept

Working 2000 Weeks Career Time Management Concept

esakal

Updated on

डॉ. किशोर पाकणीकर

जर माणसांनी वेळेला पैशाइतकेच महत्त्व दिले, तर अनेक गोष्टी बदलू शकतील. बैठका लहान होतील. निरर्थक व्यत्यय कमी होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही. नाती अधिक जपली जातील आणि सततच्या धावपळीपेक्षा अर्थपूर्ण कामाला अधिक प्राधान्य दिले जाईल. आयुष्य हे पुढे कधीतरी सुरू होणारी गोष्ट नाही. प्रत्येक आठवडा म्हणजेच आयुष्याचा एक भाग आहे. कारण एकदा निघून गेलेला आठवडा आयुष्यात पुन्हा कधीच परत येत नाही.

कधीकाळी जगभरात ‘वायटूके’ समस्येची मोठी चर्चा होती. संगणक प्रणाली १९९९ वरून २००० मध्ये जाताना अनेक प्रणाली बंद पडतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्या काळात सरकार, बँका, उद्योग आणि तंत्रज्ञान कंपन्या रात्री जागून तयारी करत होत्या. जगभरातील माध्यमांमध्ये ‘वायटूके’ हा शब्द सतत ऐकू येत होता. पण आज आपल्यासमोर एक वेगळीच समस्या उभी आहे. ती संगणकांची नाही, तर मानवी आयुष्याची आहे. तिला आपण ‘डब्ल्यू टू के’ म्हणू शकतो.

या W२K चा अर्थ आहे ‘Working २००० Weeks’, म्हणजे एखाद्या माणसाच्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यात प्रत्यक्षात अवघे दोन हजार खऱ्या अर्थाने कामाचे आठवडे असतात. पहिल्यांदा हा आकडा ऐकला की तो अविश्वसनीय वाटतो. पण थोडे गणित करून पाहा. एखादी व्यक्ती साधारण पंचविशीत करिअर सुरू करते आणि साठ-पासष्ट वयापर्यंत काम करते. म्हणजे साधारण चाळीस वर्षांचे कामकाजाचे आयुष्य. त्यातून शनिवार-रविवार, सुट्ट्या, आजारपण, प्रवास, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक थकवा आणि अनुत्पादक दिवस वजा केले, तर खरोखर अर्थपूर्ण कामासाठी उरतात सुमारे अठराशे ते दोन हजार आठवडे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com