

Donald Trump
esakal
जगातील सर्वांत स्थिर लष्करी आघाडी असलेले नाटो देश आणि अमेरिका युरोपातील आर्थिक राजकीय सामंजस्य इतिहासजमा होण्याची पायाभरणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केली आहे. त्याचं निमित्त आहे, ट्रम्प यांची ग्रीनलॅंड ताब्यात देण्याची केलेली मागणी. ग्रीनलॅंड ताब्यात घेण्यासाठी ट्रम्प काहीही कारण सांगत असलेले तरी युरोपीय देशांसाठी हे मोठं संकट बनतं आहे. मागचा बराच काळ अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील पावलं उचलणाऱ्या युरोपिअन देशांसमोर आता संरक्षणाची जबाबदारी दिली तोच उलटणार असेल तर काय करावं हा या श्रीमंत देशांसमोरचा प्रश्न आहे.